Headlines
Loading...
How to Check Drip (Tube) Quality

How to Check Drip (Tube) Quality

 ठिबक चे बंडल (नळी) कशी असावी 



ठिबक सिंचन प्रणाली हि दाबावर चालणारी प्रणाली आहे. या मुळे ठिबक नळी व त्यामधील ड्रीपर योग्य क्वालिटी  चा असणे आवश्यक आहे सोबत ठिबक संचाचा योग्य आराखडा (डिझाइन) तितकीच महत्वाची आहे. कारण या मुळे ठिबक संचा तुन योग्य रीतीने (१०% फरकाने) सारखेच पाणी दिले जाते. जेवढे सुरवातीच्या ड्रीपर ला पाणी दिले जाते तेवढेच शेवटी सुद्धा जायला हवे यात १०% चा फरक चालतो पण जास्त नसावा. याकरता योग्य डिझाईन आवश्यक आहे आणि कमीत कमी १ केजी व जास्तीत जास्त १.५० केजी प्रेशर पाहिजे तर आपली ठिबक सिंचन प्रणाली सुयोग्य आहे असे समजावे.  

 ठिबक चे बंडल (रोल) घेताना रोल वरील लेबल चेक करावे. यावर रोल कोणत्या कंपनीचा आहे.कारण ठिबक रोल ज्या मशीन वर बनतो ती मशीन व तिथे वापरलेले मटेरियल यावर आपले पैसे पूर्ण वसुल होऊन शेतातील उत्पन्न अवलंबून राहणार आहे. सोबत ते किती सिजन व्यवस्तित कार्य शम राहणार हे सर्वात महत्वाचे आहे.म्हणून चांगल्या कंपनीचेच ठिबक घ्यावे कारण ते ठिबक सर्व बाजूनी कंपनी स्वतःच चेक करते व आपले उत्पन्न सोबत ठिबक वरील खर्च पूर्ण यामुळे वसुल होतो .  

 1.प्रवाह दर किती पी.एस.आय (PSI)Pounds Per Square inch  गि.पि.म (GPM) गॅलन पर मिनिट आहे  .

2.नळी चा व्यास (Diameter) किती एम एम आहे .

3.नळी ची जाडी (Thickness) किती मिल या एम एम आहे .

4.ठिबक बंडल नळी ची लांबी किती मिटर आहे. मिटर चे फुट मध्ये करण्या साठी मीटर ला ३.२८ ने गुणावे नळी ची फुट मध्ये लांबी येईल .






I am Pradip Patil working with Rivulis Irrigation as a sales & Marketing Officer Handling Nashik, Ahmednagar, Jalgaon, Dhule Nandurbar Area.This blog is being created to provide detail information about thin wall segment products serve dealer & farmer.

0 Comments: